अनुबंध बंधनाचे. - भाग 5

  • 4.4k
  • 3k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ५ )दुसऱ्या दिवशी कॉलेज होते त्यामुळे प्रेम लवकर उठून कॉलेजला गेला. तिथूनच तो ऑफिसला जात असे. आज त्याचे कॉलेजमधेच काय, कशातच लक्ष लागत नव्हते. ऑफिसमधे पण कामात लक्ष नव्हते. त्याला सारखा अंजलीचा तो गोड चेहरा डोळ्यासमोर येत होता. एक पाचवीत असलेली मुलगी किती मोठ्या मुलीसारखी वागत होती. अजुन पण त्याला तोच प्रश्न पडला होता. ऑफिसला आल्यावर लंच टाईम मधे.... तिला कॉल करायचा कि नाही...? याचाच विचार तो करत होता. नाही... हो... नाही... हो करत त्याने ती चिठ्ठी खिशातून बाहेर काढली. त्यावरील नंबर डायल केला. दोन बेल वाजल्या तसा त्याने पटकन रिसिवर ठेऊन दिला. नाही नको. आता नको... नंतर बघू... असा विचार