त्याही वर्गानं सावधान व्हावं? जातीवरुन भांडण. अलिकडील काळात नेहमी जातीवरुन भांडण होत असतं. हा अमूक जातीचा. तो अमूक जातीचा. असा वाद होतो. त्याची जात हलकी व माझी जात उच्च असंही मानलं जातं. शिवाय जातीच्या उत्पत्तीवरुनही बरेच वाद आहेत. कोणी म्हणतात की जेव्हा गाव विकसीत झालं. तेव्हा बारा बलुतेदारांची व अठरा अनुतेदारांची उत्पत्ती झाली. ह्याच जाती ठरल्या. याचाच अर्थ असा की त्यापुर्वी जाती नसाव्यात. परंतु असे नाही. अनुतेदार व बलुतेदारांपुर्वीही काही जाती अस्तित्वात आल्या होत्या. जाती बनविण्यापुर्वी व गावंही विकसीत होण्यापुर्वी. त्याचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. जाती केव्हा निर्माण झाल्या?