माधुकरी

  • 2.9k
  • 1
  • 1.1k

 माधुकरीराणे वाडीत पहिल्या कोबंड्याने खच्चून दिलेली बांग कानात पडली अन् बाया विंचू डसल्यासारखी अंथरूणात उठून बसली. उत्तररात्री पर्यंत टक्क जागी असलेली बाया चुरचुरणारे डोळे मुठीने चोळत चोळत 'रामा रामा रामा पांडुरंगा' असं देवाचं नाव घेत उठून उभी राहिली. कार्तिकातली चावरी थंडी आणि उभे लावण्याचा एक धडपा जमिनीवर अंथरून मुटकुळं करून झोपलेल्या, संसाराच्या चिंतेने काळजारलेल्या बायाचं अगं ठणकायला लागलेलं! अलीकडे भविष्याचा घोर आणि अर्ध्या संसारातून निघून गेलेल्या नवऱ्याचं दुःख यामुळे बायाला नीज अशी येतच नसे पण राम लक्ष्मणासारखे अश्राप मुलगे आणि त्यांच्या पाठीवरची अजाण सुशी ही तीन पोरं अन्नाला लागेपर्यंत तरी हा देह जगवायला हवा इतक्या निरिच्छ बाण्याने बाया आला दिवस