नियती - भाग 6

  • 4.3k
  • 3.3k

भाग 6चालता चालता डोक्यात विचारांनी थैमान माजवले होते त्याच्या... केव्हा  झोपडी वजा घर आले समजले ही नाही.आणि त्याचे समोर लक्ष गेले....तर...समोर त्याचे वडील वाट पाहत होते त्याची.आपल्या मुलाला पाहून त्याचे आई वडील दोघेही भारावून गेले होते.तरी पार्वती अधेमधे शहरात जाऊन मोहितला भेटून येत होती. पण कवडूला मात्र कधीही वेळ मिळत नव्हता.अंगाने भरलेला जरी कवडू होता तरी त्याचे मन फारंच भावनिक होते.मोहितही आपले आई-बाबांना फार फार दिवसांनी भेटत असल्यामुळे तात्पुरते तो सर्व काही विसरून गेला.त्याच्या आईला भारावल्यागंत ...त्याला काय करून देऊ खायला...??  आणि काय नाही ....??..असे वाटू लागले.मोहित ने मग एक एक किस्से सांगितले.मोहितचे बाबा कवडू आणि आई पार्वती आज निवांत