भाग 2त्या काळी कॉलेजमधून घरी आलो की अभ्यासाव्यतिरिक्त करण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते.वस्तीतल्या अनेक मुलांशी ओळख झाली होती.नित्यनेमाने संध्याकाळी रस्त्यावर उभ्या असलेल्या मंडळाच्या पोरांच्यात गप्पा मारत उभे राहणे हाच माझा एकमेव टाईमपास होता.तिथे भेटलेल्या मुलांशी नंतर माझी छान मैत्री झाली. शिर्के बंधुबरोबरच बाळू नितनवरे,आसिफ पठाण,सुरेश गायकवाड,आल्फ्रेड सायमन, चंदू घोलप, अशोक कांबळे, सदा निकम नाना निकम असे वीस पंचवीस मित्र माझ्याशी जोडले गेले. यातले बरेचजण अर्धशिक्षित होते.काहीजण वर्कशॉपमधे छोटीमोठी कामे करत.कुणी रिक्षा चालवायचे.एकाची पानटपरी होती तर एकाचे किराणा मालाचे दुकान होते.त्यातल्या त्यात आमच्या या मित्रांमध्ये आल्फ्रेड सायमन हा अव्हेरी इंडिया सारख्या नामांकित कंपनीत नोकरी करायचा,यातले अनेकजण बेकार होते.काहीजण नियमितपणे दारूही पीत असत.अनेकांची लफडी