भाग 9आपल्या आई-बाबांच्या मनस्थितीत पासून अनभिज्ञ मोहित भराभर पावले उचलत एका दिशेने निघाला गावाच्या..संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती. त्याचा जीव धडधड करू लागला कारण ती तिथे एकटी होती. पोहोचायला त्याला पंधरा मिनिटे तरी लागणार होती.जसा शॉर्टकट घेता येईल तसा तो शॉर्टकट घेत गेला तरी त्याला पोहोचायला बारा मिनिटे लागले.पोचल्यानंतर तू इकडे तिकडे पाहू लागला...पण तिथे...........मायरा ओढ्याच्या काठावर वीस मिनिटांपूर्वीच पोचली होती. एखाद्या दगडावर बसून वाट पाहत होती. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला दोन गुरे गुरकावून एकमेकांशी भांडत होते... त्यांच्या शिंगांची आघात एकमेकांवर होत होते.मायरा तिथे बसली होती तेव्हा दुरून तिला दोन डोळे न्याहाळत होते...मायराचे वडील बाबाराव... गावातल्या एक प्रतिष्ठित व्यक्ती... घरंदाज करारीपणा त्यांच्या