चाळीतले दिवस भाग5 आमची वस्ती जरी चाळ म्हणून ओळखली जात असली तरी प्रत्यक्षात महानगरपालिका हद्दीत अंदाजे पंचवीस तीस एकराहून अधिक सरकारी जागेवर अस्ताव्यस्त पसरलेली गरीब वा निम्नमध्यमवर्गातील लोकांची गलीच्छ वस्ती होती. आजूबाजूच्या छोट्या मोठ्या कारखान्यातले रोजंदारी कर्मचारी,रिक्षाड्रायव्हर्स, खाजगी कंपन्यात काम करणारा कुशल कामगार याबरोबरच सरकारी ड वर्ग कर्मचारी क्वचित पांढरपेशा व माजी सैनिक इथे मोठ्या संख्येने रहात होते.हाताला काम नसणाऱ्या तरुणांचा भरणाही इथे होता.दिवसभर मटका जुगार खेळणारे,बीडी शिगारेट दारूच्या व्यसनात अडकलेल्या लोकांची संख्याही खूप होती.काही सिनेमा स्टाईल सडकछाप प्रेमवीरही इथे होते. खुलेआम आपापल्या मैत्रिणीना घेऊन गुण उधळणारे तरुणही आजूबाजूला होते.इथे प्रेमापेक्षा तारुण्यसुलभ आकर्षणातून लपून छपून एकत्र येणाऱ्या तरुणाईला पाहून इथे रहाणाऱ्या