स्वातंत्र्य - भाग 2

  • 1.1k
  • 407

स्वातंत्र्य भाग दोन            तो स्वातंत्र्याचा इचार. तो इचार करता करता त्याईचं बालपण कवा संपलं व ते कवा मोठे झाले. ते त्याईले कळलंच नाई. मंग सुरु झाला खरा संघर्ष. स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी परिस्थिती अशी होती का त्या प्रत्येकाईले वाटत होतं, आपण खरंच स्वतंत्र्य झालोत काय? त्याच एका ईचारानं त्या सर्व मित्राईनं पुन्हा एक स्वातंत्र्याची लढाई लढली होती. जी लढणं अति आवश्यक बाब बनली होती.             तो सामाजिक परीवर्तन करण्याचा तो काळ. त्या काळात त्याईच्यासमोर बऱ्याच अडचणी आल्या. परंतु त्या अडचणींचा बाऊ न करता ते मित्र सामाजिक परीवर्तन करण्यासाठी लढत रायले अविरतपणे.