अजून ही बरसात आहे ..... - भाग 8

  • 2.9k
  • 2k

     राधाला अस अचानक अर्जुन साठी आलेलं पाहून ..... अर्जुन सकट सगळेच राधा कडे  अश्चर्याने  पाहून लागले ....राधाने एक नजर सगळयाकडे भिरवली ....सगळेजण तिच्याकडे च बघतात ....हे पाहून ती स्वयंपाक घरात जवळ जवळ पळतच गेली ....राधाच्या नवऱ्याला .....आल्यापासून आधीच अर्जुनचा राग आला होता .....त्यात राधा अशी अचानक अर्जुनसाठी आलेली पाहून त्याला अजूनच अर्जुनसाठी राग आला .....               राधा अशी अचानक निघून गेल्यावर .....राधाच्या जाऊबाई ने काहीबाही सांगून राधाची बाजू सावरून घेतली ......             आता एक एक करून पाहुण्यांची जायची गडबड चालू झ्हाली ...... अर्जुन आणी निशा ही घरी जायला निघाले