मुक्त व्हायचंय मला - भाग ४

  • 2.8k
  • 1.9k

मुक्त व्हायचंय मला भाग ४मागील भागावरून पुढे…रघूवीर आणि मालतीचं लग्नं होऊन साधारण दोन महिने झाले असतील. या दोन महिन्यातच मालतीला वीस पंचवीस वर्षांचा संसार केल्यासारखं वाटायला लागलं.मालतीच्या घरचे खूप माॅडर्न नसले तरी जगाच्या बरोबर चालणारे होते. कुठल्याही प्रसंगी निर्णय घ्यायचा असेल तर तिच्या घरचे सगळे एकत्र बसून विचार विनीमय करायचे. सगळेजण आपली मतं सांगायचे. पण विषय ज्याच्यासंबंधी असेल त्यानेच फायनल निर्णय घ्यायचा मग तो इतरांना अमान्य असला तरी ते या निर्णयावर आक्षेप घेत नसत.रघूवीरकडे सगळं ऊलटच होतं. रघूवीरच्या घरी सगळं त्याच्या हुकूमानुसार चालत असे. मालतीला मोबाईल घेण्याची सोय नव्हती. एक दिवस तिच्या भावाचा चंदूचा रघूवीरला फोन आला.अजून सगळं नवीन असल्यामुळे