मुक्त व्हायचंय मला - भाग ५

  • 2.7k
  • 1
  • 2k

मुक्त व्हायचंय मला भाग ५मागील भागावरून पुढे…दुस-या दिवशी चंदू मालतीच्या ऑफीसमध्ये लंचटाईममध्ये भेटायला जातो." मी काल फोन केला होता रघूवीरला." चंदू"कशाला?" मालती"अगं दोन महिने झाले तुमच्या लग्नाला.तुझ्याशी बोलणं झालं नाही म्हणून आईबाबा म्हणाले बघ तिला फोन करून ती येत असेल तर.म्हणून मी तुला घरी लॅंडलाईन वर फोन केला तर रघूवीर म्हणाले महत्त्वाचं काम असेल तरच मालतीला माहेरी पाठवीन.तेकाम मला महत्वाचं वाटलं तरच पाठवीत.एवढं बोलून झालं नंतर तुला फोन दे म्हणणार होतो तर त्यांनी फोन कट केला." चंदू"चंदू यापूढे घरी फोन करत नको जाऊस." मालती"का?" चंदू"नाही आवडत त्यांना." मालती "कमाल आहे सख्ख्या भावाने फोन केलेला आवडत नाही.!" चंदूहो. दुर्दैवाने आहे तसं