पाखरांची भाषा

  • 3.1k
  • 1
  • 1k

पाखरांची भाषा          नित्य नेमाप्रमाणे मूठभर तांदूळ अन् पाण्याचा गडवा घेऊन कमू देवरण्याकडे येताना दिसली. जांभळीच्या झाडावर बसून तिची वाट पहाणाऱ्या भोरडया, साळुंख्या, बुलबुल, दयाळ अन् देवरण्याच्या मुळाशी नाचणाऱ्या सातबायांनी पंखाचा फटर्र-फटर्र फऽट फटर्र फाट आवाज काढीत कलकलाट सुरू केला. ती मोडण चढून वर येईपर्यंत थोप नसलेली पाखरं तिच्या डोक्याभोवती गिरक्या मारू लागली. मुठीतले तांदूळ देवरण्याच्या माथ्यावरील सप्पय तासलेल्या चिन्यावर टाकून पाण्याचं परळ भरता भरता मैत्रिणीशी बोलावं अशा थाटात कमू सांगायला लागली. "सिर्रर सिक्क च्यू... कुच्चू सीब्ब् च्युकर्र कुरर्र स्त्रकुर्कर्र मीम्स थ्युक्क चिर्र... चिरिक्क चिक्नु सिर्सर भ्रक थुर्रर्र त्रु रु मर्क कृ रिर्र मिर्वर्र स्वाक्क सुर्रर्र स्वर्कर