मुक्त व्हायचंय मला भाग ८वामागील भागावरून पुढे…मालती घरात हिंडू फिरू लागते. मावशी आणि मालती यांच्यात जमलेली गट्टी रघूवीरच्या लक्षात येऊ नये म्हणून रघूवीर घरी आल्यावर दोघी एकमेकींशी बोलत नाहीत. मावशींना मालती जवळ राहावंसं वाटत असतं पण मालती आता घरात हिंडू फिरू लागली म्हणजे आता ती ऑफीसमध्ये जाईल म्हणजे आपला इथला मुक्काम संपला हे मावशींच्या लक्षात येत़.तसं त्या उदास राहू लागतात.मालतीच्या हे लक्षात येतं तसं ती विचारते"मावशी काय झालं? बरं वाटत नाही का?" "बरं आहे." मावशी"मग एवढ्या उदास का असता?""काही नाही " मावशीअसं म्हणून मावशी घाईने स्वयंपाकघरात जातात.त्यांना आपल्या डोळ्यात येणारे पाणी मिरचीला दिसू नये असं वाटतं.मालतीच्या मनात शंका असतेच म्हणून तीही मावशींच्या