मुक्त व्हायचंय मला - भाग ९

  • 2.1k
  • 1.4k

मुक्त व्हायचंय मला भाग९वामागील भागावरून पुढे…याही गोष्टीला बरीच वर्ष झाली.मावशींचं गावाकडे जाणं हळूहळू लांबत गेलं.पुन्हा जेव्हा मालतीला चक्कर आली तेव्हा तिला दिवस होते पण मालतीने या वेळी हुशारी केली रघूवीरला सांगीतलं नाही. पण रघूवीरचा त्रास तीन महिने कसा थांबवायचा यावरही मालतीने तोडगा काढला.अती श्रमाने त्या दिवशी मालती चक्कर येऊन पडली तेव्हा तिच्या पायाला जखम झाली.त्याला व्यवस्थीत बॅंडेज करून औषध घेऊन मालती आणि मावशी डाॅक्टरांकडून आल्या. त्या पायाची सबब सांगून मालतीने स्वतःला  रघूवीरपासून वाचवलं." सूनबाई आता जरा दमाने घ्या.दोन जीवांच्या आहात. आता फक्त पायावर निभावलं जास्त दगदग करू नका.मी आहे नं!" मावशींनी मालतीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला." मावशी तुम्ही असतांना मला