नियती - भाग 17

भाग 17तेवढ्यात मोहित चा फोन व्हायब्रेट झाला....तसा तो आपल्या जवळचे पुस्तक त्याने ठेवून दिले आणि तो उठला...फोन त्याच्या पॅन्टच्या खिशात व्हायब्रेट होत होता.. पण ती व्हायब्रेशन मोड वरची गुणगुण ऐकू जाऊ नये म्हणून तो ताडताड बाहेर निघाला.... आणि....बाहेर निघून सर सर सर एकांत हवा असल्यामुळे इकडे तिकडे जायचं सोडून तो सरळ स्मशानाच्या भिंतीच्या तिकडे आतल्या दिशेने गेला.फोन उचलला...पलीकडून मायरा बोलत होती.दहा-पंधरा मिनिटे बोलणे झाल्यानंतर तो घरात आला.मनात त्याच्या विचारांनी ढवळाढवळ केली होती.काय करावे बरं आपण...?? मायरा म्हणते तसं करावं काय..?? एवढे दिवस दूर राहायचं का तिच्यापासून..??आपल्याच धुंदीत घरात येऊन खाली चटई अंथरली आणि लेटला..आज तरी त्याला सध्या कोणताही विचार करायचा