1857 चा राष्ट्रीय उठाव

  • 1.5k
  • 1
  • 468

   पार्श्वभूमी : ·        सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. ·        सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. ·        हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे. ·        ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द त्यापूर्वीच्या शंभर वर्षाहून अधिककाळ जो असंतोष होता त्याचाच परिपाक या उठावाच्या रुपाने झाला. ·        इसवी सन 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते. ·        1760-70 च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना