अनुबंध बंधनाचे. - भाग 15

  • 2.5k
  • 1.6k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १५ )आज सोमवार होता. रोजच्याप्रमाणे प्रेम ऑफिस मधे आला होता. दुपारी लंच टाईम झाल्यावर दोन वाजता अंजलीचा कॉल येणार हे जवळजवळ नेहमीचं झालेलं होतं. कारण त्याचे बॉस लंच साठी घरी जायचे मग त्यांना यायला चार तरी वाजायचे. हा वेळ प्रेमसाठी तसा फ्री असायचा. अंजलीच्या घरी तसा काही प्रॉब्लेम नव्हता. कारण तिच्या रूम मधे पण फोन होता. म्हणून अंजली दुपारी दोन नंतरच त्याला कॉल करायची. आजची गोष्ट जरा वेगळी होती. दोन वाजून गेले होते. प्रेम खुप वेळ तिच्याच फोन ची वाट पहात होता. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. आणि प्रेम ने रीसिवर उचलुन कानाला लावला. अंजली : हाय... जानु.... कसा आहेस...?प्रेम