नियती - भाग 22

  • 3.3k
  • 2.1k

भाग 22"आपण बोलून काय उपयोग ...??"अशा हिशोबाचे व्यक्ती सावधपणे बोलत होते .....कोणी कसाही बोलला तरी गावात थोरामोठ्यांच्या बंगल्याच्या दारात एक लगीन धडाक्याने साजरे होणार आहे ....आणि या समारंभात .....ते दोन...चार दिवस उभ्या गावाची चंगळ राहणार आहे या कल्पनेतले सुख मात्र प्रत्येकालाच हवेहवे असे होते .....पण तिकडे मोहित.....तो घरात अभ्यास करत राहत असल्यामुळे त्याचे बाहेर काही तेवढे येणे जाणे नव्हते... त्यामुळे त्याच्या कानावर कोणतीही गोष्ट पडली नव्हती. जरी तो बाहेर कामानिमित्त गेलाही तरी बाबाराव यांच्या परिवाराबद्दल बोलणे हे उघडपणे होत नव्हते कारण..........त्या नावाचा धाकच  एवढा होता की चुकून आपल्या तोंडून असं तसं काही निघायचं आणि आपला मूडदा चार दिवसांनी कुठेतरी लटकत दिसायचा या