पिंगळ्याची भाक

  • 1.1k
  • 1
  • 345

पिंगळ्याची भाक  महिम्न, त्रिसूपर्ण, पुरुषसूक्त पुरे झाले आणि पुर्षाबाळंभटाकडे जायचा बंद झाला. नेहमीप्रमाणे सकाळीच उठून संथा घ्यायला म्हणून तो साळसूदाप्रमाणेघराबाहेर पडायचा. पण बाळंभटाकडे न जाता थेट बंदर गाठायचा. बंदराजवळ सातवाहनाच्या काळातली पडझड झालेली गढी होती. तिथे दिवसभर गावातली उनाड पोरे हुदू घालायची. बेदाद वाढलेल्या वडा-पिंपळाच्या झाडांवर सूरपारंब्या खेळायची. कुणी हत्ती तलावात पोहायची. भुकेच्याआगीला चिंचा, आवळे, बोरे, चिकणे, भोकरे, ओवळदोडे, आंबे असला रानमेवा आलटून पालटून चाखता यायचा. गावात