मतदान करुन देशाचा जीव वाचू शकतो

  • 879
  • 252

प्रत्येकानं मतदान करावं         *निवडणूक. निवडणूक म्हटली तर मतदारांना आकर्षित करणं आलंच.  त्यासाठी जनतेला प्रलोभन देणं आलंच. काल जनतेला असं प्रलोभन दारु आणि पैशाच्या स्वरुपात दिलं जायचं. काही ठिकाणी साड्यांचंही वाटप चालायचं. जेवनावळ चालायची. ज्यात कोंबड्या बकऱ्यांचं जेवन असायचं. आज असं प्रलोभन मुख्यमंत्री सहायता योजना म्हणून देणं वा लाडली बहिण योजना म्हणून देणं. याला काही लोकं गैर तर काही लोकं रास्त योजना समजतात. काही लोकं त्या योजनेला प्रलोभन समजतात तर काही लोकं त्या योजनेला मदत समजतात. प्रलोभनाच्या दृष्टीनं या योजनेचा विचार केल्यास जर आजच्या काळात जनतेला प्रलोभन दिलं नाही तर जनता मतदान तरी करेल काय? हा विचार आहे