अनुबंध बंधनाचे. - भाग 17

  • 2.1k
  • 1.2k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १७ )जसजसे दिवस पुढे जात होते तसे, प्रेम आणि अंजली यांचं नाते अजुनच बहरत चाललं होतं.दोन वर्ष अशीच अगदी आनंदात गेली होती. या कालावधीत ते दोघे एकमकांच्या अजुनच जवळ आले होते. त्या दोन वर्षात तिने स्वतः साठवलेल्या पैशातून प्रेमला एकदा मोबाईल फोन गिफ्ट म्हणुन दिला होता. आणि दुसऱ्या वर्षी एक सोन्याची चैन गिफ्ट दिली होती. खरं तर प्रेमसाठी असे महागडे गिफ्ट स्वीकारणं खुप अवघड व्हायचं, पण अंजली थोडी हट्टी होती, ती काहीही करून ते त्याला घ्यायला भाग पाडायची. आणि आता प्रेम जवळ मोबाइल असल्यामुळे ती त्याला कधीही कॉल करू शकत होती. आता वेळेचं बंधन उरलं नव्हतं.    अंजली आता