क्षमा - 5 (अंतिम भाग)

  • 1.7k
  • 997

विजय.... नमन कडे आला, नमन एका कोपऱ्यात बसला होता, विजय ने नमनला सहज पणे विचारलं....."हत्या करून तू घरातून किती वाजता पडालास".......???नमन हे ऐकून उठला.... तो विजय पासून नजर चोरायला लागला, त्याचा कपाळाला घाम फुटला"मला लक्षात नाही"..... नमन थोडं घाबरत बोलला"लक्षात नाही.... बर लॉजला किती वाजता पोचलास हे तरी लक्षात आहे की विसरलास"..... विजय खंबीरपणे बोललानमनचा चेहरा पूर्ण घामाघूम झाला होता..... त्याला काहीच सुचत नव्हतं की काय बोलावं"नसेल तुला लक्षात"..... म्हणत विजय ने लांब स्वाश घेतलं, "तू लॉजला दुपारी साडे अकराला पोचलास..... जे तुझा घरा पासून दिढ तास लांब म्हणजेच घरातून तू जवळ पास दहा वाजता निघाला अशील..... काय बरोबर ना,