मुक्त व्हायचंय मला - भाग १२

  • 2k
  • 1.2k

मुक्त व्हायचंय मला भाग १२वामागील भागावरून पुढे…" माधव आता आई या घरात थांबणार नाही असं दिसतंय" सरीता"हो आईला थांब असंही बाबा म्हणणार नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. कारण त्यांचा अहंकार आडवा येतो." माधव"आपला जन्मच होऊ नये असं बाबांना वाटत होतं हे आई म्हणाली. माधव तुझा यावर विश्वास बसतोय?" सरीता"मनात शंका येते पण एवढं मोठं खोटं ती का बोलेल? आजपर्यंत आपण कधी आईच्या इतक्या जवळ गेलोच नाही त्यामुळे ब-याच गोष्टी आपल्याला माहिती नाही." माधव"मग आता काय करायचं? बाबांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?" सरीता"आई ऊद्याच नवीन घरात जाणार आहे. तेव्हा घरात काय नाटक घडेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे." माधव"आईने पाठवलेली घटस्पोटाच्या