मुक्त व्हायचंय मला - भाग १३

  • 2.8k
  • 1.5k

मुक्त व्हायचंय मला भाग १३ वामागील भागावरून पुढे…सकाळी सकाळी सरीता ने माधवला फोन केला."माधव काल केला होतास का रात्री आईला फोन?""हो. आज दहाच्या सुमारास ती घराबाहेर पडणार आहे." माधव"तू केव्हा भेटणार आहेस तिला?" सरीता"ती म्हणाली घरी नको येऊ. मी बाबांशी बोलेन. तू माझ्या नवीन घरी ये अस म्हणून हसली." माधव"अरे खरंच आहे ते नवीन घर तिच्या हक्काचं आहे. इथे या घरात ती इतकी वर्ष राहायचं म्हणून राह्यली." सरीता"मलापण आता आजी, आजोबा,मामा आणि मामीला भेटावसं वाटतंय." माधव"होरे मलापण भेटावसं वाटतंय." सरीता"आईने पत्ता सांगितला नाही ती ऊद्या ऑटोरिक्षा मध्ये बसली की मेसेज करणार आहे.मी तो मेसेज तुला पाठवीन. मग तिथे ये." माधव"तू