काळ सोकावलो

  • 1.3k
  • 1
  • 402

काळ सोकावलो             सगळाथाटमाट करून सुमलीवैनी घराबाहेर पडेपर्यंत पावणेदहा होत आले. वाट बघून दीड तास कुचंबलेला दिगू रिक्षावाला जाम वैतागलेला.... पण करतो काय? रिक्षा, ड्रायव्हिंग लायसन, बॅच काढणे ते रिक्षासाठी बँकलोन प्रपोजलपर्यंत सगळी मदत सुमलीवैनीच्या नवऱ्याने बाबलशेठने केलेली, दिगू त्याचा मिंधा ! वैताग गिळून मऊ आवाजात दिगू म्हणाला, “वैनीबायऽऽ, बेगुन आवरा नी भायर पडा कणकवली मालवण गाड्यो इल्यो काय पोरकरणींची आनी वांगडच्या मानसांची झुंबड होतली, मगे नंबर लागान् तुज्या झीलाक ढोसपाजान होयसर दीड वाजतलो.... म्हनान सांगतय.. लवकर हास्पिटल गाटुया नी नंबरलावया....” खानदानी तोऱ्यात दिगुकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकीत कानातल्या कुड्याचेमळसुत्र फिरवून घटट् करीत सुमलीवैनी गरजली, “नंबराची भिती माका? या गावकारनीक भितीघालतस तू