नियती - भाग 31

  • 2.9k
  • 2k

भाग 31मोहित....."मला नको ती.... तुला आणि मला राबवून घेईल दोघे बापलेकं ...सगळेच दिवस... मजुरासारखे...तुला मजूरंच बनून राहायचं आहे का...???तीन वर्ष थांब फक्त... तुला मी मग.... बंगल्याची राणी आणि बाबांना बंगल्याचा राजा बनवेल."असं म्हणून मोहितने पार्वतीच्या माथ्यावर ओठ ठेवले.......तिकडे कुलकर्णी बंगल्यासमोर...रात्री साडेनऊच्या दरम्यान ..... कारचा करकचून ब्रेक दाबल्यामुळे जोराने आवाज झाला.,... आणि आरामशीर बसून असलेला वॉचमन दचकून उभा झाला ....आणि.....एक आलिशान काळ्या रंगाची कार गेट समोर उभी राहिली... वॉचमन ने गेट खोलले.... कार आत मध्ये बंगल्यात एका साईडने घेतली आणि पुन्हा नियंत्रण सुटून  मग गचकन ब्रेक दाबल्यामुळे  ती पोर्चच्या खांबाला जिथे झोपाळा होता तेथे धडक देता देता थांबली....त्यातून जी व्यक्ती उतरली