गोळ्याचे सांबार

  • 267
  • 69

🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिचा हातखंडा असेकितीही गडबड असली आणि कोणतेही प्रमाण नसले तरी तिचा पदार्थ उत्तमच होत असे.गोळ्याचे सांबार ही आईची अगदी हातखंडा पाककृती होतीमहिन्यातून एकदा रविवारी हा प्रकार घरी असेकधी भाजी नसली आणि इतर वारी आईने हा प्रकार केला आणि शाळेत मी डब्यातून नेला तर मैत्रीणी खुष होत असत पण डब्यात नेलेले हे सांबार दोघी तिघींसाठी अगदीच थोडे असे.. पुरत नसेत्यांची जीभ आणखी खवळत असेमग त्या म्हणत..एकदा घरी बोलाव ना तुझ्याकडे हे खायला..तशा आम्ही कॉलेज सुटल्यावर अचानक सुध्दा एकमेकींकडे जात असू पण माझ्याकडे माझी आई शिक्षिका असल्याने इतर दिवशी ती घरात नसे त्यामुळें त्यांना जेवायला बोलावणे जमत नसे रविवारी