बांडगूळ गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची अटी तटीची निवडणूक दोन तासांवर येऊन ठेपली.धर्मदाय आयुक्तांनी नेमलेल्या प्रशासकाला डोणग्यांनी मॅनेज केलेले.... इलेक्शन प्रोग्रॅम डिक्लेअर होण्यापूर्वी एक दिवस डोणग्यांनी त्यांच्या वगीतले ६० मेंबर्सनव्याने दाखल करुन घेतलेले. जुन्या मेंबर्सपैकी जवळपास निम्मे लोक आतुन पैसे देऊनखरेदी केलेले.... आबा दळवी चारीमुंड्या चीत होणार याची हेडमास्तर आणि संस्थाअध्यक्ष ज्ये. वाय्. डोणग्यांना शंभर टक्के खात्री.... तरीही खबरदारीचा उपायम्हणून ज्ये. वाय्. डोणग्यांचा भाऊ..... संस्थेचा सेक्रेटरी आणि हायस्कुलचाक्लार्क क्रिष्णा डोणग्याने प्लॅन आखला....प्लॅनची कार्यवाही अखेरच्या क्षणाला करायची.... ती वेळ येऊन ठेपली.... के. वाय. उर्फ कृष्णा डोणगेनी झिप्रेसरांना खूण करुन ते स्वतः ज्ये. वाय्. डोणग्यांच्या केबिनमध्ये शिरले.... ! अवचितपणे के.वाय्. आलेला बघून