आज निवडणूक निकालाच्या दिवशी *आज तेवीस तारीख. कोण निवडून येणार व कोणाला बहुमत मिळणार हा एक गुंतागुंत निर्माण करणारा मुद्दा. त्याबद्दल घेतलेला आढावा.* नेते म्हटले की त्या नेत्यांवर विश्वास करणारे आज भरपूर आहेत. काही लोकं त्यांचेवर विश्वास ठेवून ते जसं सांगतात. त्या पद्धतीनं वागतांना दिसतात. लोकं नेत्यांवर विश्वास ठेवून आपले अमुल्य मतही अगदी निःशुल्क त्या नेत्यांना अर्पण करीत असतात. त्यावेळेस असं वाटायला लागतं की हे त्या नेत्यांचे अंधभक्तच असावेत. एवढी अगाढ श्रद्धा मतदारांची नेत्यांप्रती असते. कारण जनता ही कोमात असते. ती विचारच करीत नाही की कोण आपल्या कामाचा व कोण आपल्या कामाचा