बकासुराचे नख - भाग २

 -----कोण होती ती गूढ स्त्री....यक्षिणी..आसरा ...हडळ की एखादी नागीण...? या  परीसरात अद्भुत शक्ती वावरताहेत असं मला वाटलं.मी झपाझप पावले टाकत खाली उतरायला लागलो.आता मला मागे वळून बघियचीही हिंमत होत नव्हती.--------******------*****-------*****----बकासुराचे नख भाग ३लवकरच मी महंतो व योगेशला गाठलं. चालताना सुध्दा मी सगळ्या घटनांची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न करत होतो.पण काहीच कळत नव्हते.तो बुटका माणूस....त्या दगडी गुहा...तो भला मोठा सांगाडा...तो साप...ती गूढ स्त्री... आणि योगेशने पाठविलेले ते अमानवीय नख...कसलाच मेळ लागत नव्हता." कुठं अडकला होता?" महंतोनी विचारले." नाही...सहजच...." मी म्हणालो. मी जे बघितले ते यांना सांगायचे की नाही याचा निर्णय मी करत होतो.शेवटी योगेश असताना सांगणं बरोबर वाटेना म्हणून मी गप्प राहिलो.