कूर्ग खाद्य भ्रमंती

  • 2.4k
  • 783

कुर्ग खाद्यभ्रमंती .. माडीकेरी जिल्ह्यातले कुर्ग ज्याला कोडगू असेही म्हणले जाते कोडगू हा तिथला एक समाज आहे . हिरव्यागार वन संपत्तिने नटलेले हे गांव म्हणजे पृथ्वीवरच स्वर्ग अवतरल्या सारखे वाटते असे म्हणणे चुकीचे नाही. उंच सखल रस्ते असणारे हे देखणे गांव ..आकाशातून सतत वेगवेगळ्या आकाराचे ढग पळत असतात . संध्याकाळी या रंग बेरंगी ढगांची अवर्णनीय शोभा पाहायला सगळे राजाज सीट नावाच्या पॉइंट वर जमतात .हवा अतिशय शीतल आणि आल्हाददायक मैसूर कुर्ग प्रवास तर अतिशय रमणीय आहे . रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच झाडांची मोठ मोठी जंगले अधून मधून मसाल्याच्या बागाकॉफीचे मळे .. त्या बागांतील कच्या पिकल्या फळांचा येणारा मंद सुगंध ..तिकडे गेल्यावर पारंपारिक स्थानीय पदार्थ (लोकल फूड )मिळणारे हॉटेल कोणते असे