आता मंडप व मिळवणुकीवरही दंड लावावा? *नुकतीच शहरात एक प्रकारची जनजागृती होत आहे आणि केली जात आहे. ती जनजागृती आहे, हेल्मेट वापराविषयीची. हेल्मेट हा आपल्या सुरक्षेचा विषय असून शासनानं गतकाळातच हेल्मेट वापरासंबंधी नियम बनवले. ज्यात दुचाकी चालकाला आणि चालकाच्या पाठीमागं बसणाऱ्यालाही हेल्मेट वापरणं शासनानं सक्तीचं केलं. आता जर या दोहोंपैकी एकानं जरी हेल्मेट वापरला नाही तर दंड होणार आहे. ज्यातून दंड म्हणून आलेल्या रकमेतून देशाचा विकास करता येईल. तेच धोरण राबवून नवीन कायदा असाही बनावा की मंडप टाकणाऱ्याला व नवरदेवाची मिळवणूक काढणाऱ्यालाही दंड व्हावा. जेणेकरुन त्यातून पैसा मिळेल व तोही पैसा देशाच्या विकासाच्या कामी येईल.*