हेल्मेट सक्ती रस्ते अपघात व चर्चेला उधाण

  • 549
  • 171

*हेल्मेटसक्ती, रस्ते अपघात व चर्चेला उधाण*          *सुचना - हेल्मेट सक्ती करण्याऐवजी वाहनांच्या गतीला नियंत्रीत करण्याची सक्ती करावी.*           महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली. मुख्यमंत्री बनविण्याचा पेच कायमच आहे. त्यातच शासनानं एक निर्णय पारीत केला. तो म्हणजे हेल्मेटसक्ती. हेल्मेट हा दुचाकीस्वारांपैकी दोघांनीही म्हणजेच चालकानं व चालकाच्या मागे बसणाऱ्यानंही वापरावा. त्याचं कारण आहे रस्ते अपघात.          रस्ते अपघाताच्या बाबतीत नागपूरचा म्हणजेच एका शहराचा विचार केल्यास एका नागपूरात तब्बल एकशे एक्यान्नवच्याही वर अपघात झालेत. ज्यात एकशे तेरा लोकं मरण पावलेत. ज्यात सर्वजण विनाहेल्मेट होते. सर्वात जास्त अपघात अजनी विभागात झाले. त्यामुळं केवळ नागपूर शहरातच नाही