नियती - भाग 41

  • 1.8k
  • 930

भाग 41पण मुख्य म्हणजे कोणत्या रस्त्याने आपल्याला जायचे आहे तेच तिला समजत नव्हते. जुलीने मायराच्या चेहऱ्यावरील  कावरेबावरेपणा निरखून घेतला आणि ती अतिशय हळुवार आवाजात म्हणाली...."चल ...आपण तिकडे त्या दुकानात थोडावेळ बसू... उभे राहून पाय दुखत आहेत..."मायराला आता थोडं विचित्र वाटू लागलं शरीरात... डोकं काम करत नाही असं वाटू लागलं... बोलायचे आहे काहीतरी पण तोंडातून शब्द फुटत नाहीत असं जाणीव होऊ लागली...मायराला नकार द्यायचा होता... पण बोल निघत नव्हते मुखातून.... आता तेथे जॅक आला त्यांच्याजवळ.मायरा एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे पहात होती... जॅक तारवटलेल्या डोळ्यांनी केसांची झुलपे एका हाताने वर सरकवत सिगरेटचा दीर्घ झुरका घेत मायराकडे पाहून विचित्र हसू लागला आणि जुली कडे