माझ्या अंताची तारीख मला माहीत असती तर... मृत्यू हे मानवी जीवनाचे अंतीम सत्य आहे.इथे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला एक न एक दिवस या सत्याचा सामना करावा लागणार आहे तसाच माझाही एक दिवस अंत निश्चित होणार आहे परंतु तो कधी कसा कुठे हे एक गुपित आहे.त्या मला माहित नसलेल्या क्षणापर्यंत निदान मी अमर आहे अशाच थाटात मी जगणार आहे. समजा, जशी एखाद्या वस्तूवर त्या वस्तूच्या उत्पादनाच्या तारखेबरोबरच त्याच्या एक्सपायरीची तारीख लिहिलेली असते तशी मला माझ्या मृत्यूची तारीख वेळ आणि कारण ही गुपिते आधीच माहीत असती तर?तर माझ्या जीवनात काय काय फरक पडला असता?या गोष्टीवर मनात विचारांची वादळे घोंघावू लागली लागली...किती फरक पडला