गतकाळातील नगरवधू आम्रपाली - भाग 1

  • 4.6k
  • 1
  • 2k

आम्रपाली भाग एक मनोगत           आम्रपाली ही माझी नव्यान्नववी पुस्तक. वाचकांच्या हातात देतांना या साहित्यकृतीबद्दल मला अतिशय व मनापासून आनंद होत आहे.         आम्रपालीबद्दल सांगायचं झाल्यास आम्रपाली ही एक वास्तविक कहाणी. परंतु त्यात मी काही काल्पनीकही कहाण्या जोडल्या की त्या वास्तविक आहेत अशाच वाटतात. शिवाय एका लेखकाला पुस्तक लिहितांना काही काल्पनिकता टाकावीच लागते. त्याशिवाय त्या पुस्तकाचा  विस्तार करता येत नाही. शिवाय काही लोकांची माफी मागतो की मला आम्रचालीच्या चरीत्राबद्दल माहिती त्यांच्याच लेखनातून मिळाली. जे गुगलवर आहे. गुगलवर संपर्क क्रमांक नसल्यानं फोन करता आला नाही. त्याबद्दल माफ करावं. ऐतिहासिक लेखन करतांना संदर्भ म्हणून तशी माहिती घ्यावीच लागते.