दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 1

  • 8.1k
  • 3.7k

सकाळची कोवळी किरणे अभिमन्यूच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग येते. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप डोळ्यांत साठवून अभिमन्यू अंघोळीला जातो. सगळं काही आवरून तो खाली देवघरात जातो. अभिमन्यू आणि त्याच्या आईची स्वामी समर्थांवर श्रद्धा होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो स्वामी समर्थांच्या नाम जपाला बसतो. अजित : नाश्ता झाला आहे का ग? आणि अभी उठला का ?  आरती : हो...उठून नाम जपाला बसला आहे... त्याचं आवरलं की सगळे एकत्रच बसू नाश्ता करायला...  अजित : बर तोवर मला चहा तर दे... आरती : हो आणते... अजित : आज मला यायला उशीर होईल ग.... आरती : का अहो ? अजित : अगं तो चारुदत्त