अनुबंध बंधनाचे. - भाग 28

  • 303
  • 63

अनुबंध बंधनाचे.....( भाग २८ )अखेर तो दिवस आला होता. १५ ऑगस्ट. प्रेम ने आधीच सर्व प्लॅनिंग केले होते. तिचा वाढदिवस सुट्टीच्या दिवशी येत असल्यामुळे तिला जास्त वेळ बाहेर पडता येणार नव्हते, हे प्रेमला माहित होते. कारण त्या दिवशी तिचे डॅड पण घरीच असत. त्यांच्या घरी तर तिचा वाढदिवस खुप मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केला जात असे. पण प्रेमला तिच्यासाठी छोटसं का होईना पण छान काहीतरी सरप्राइज करायचं होतं.ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी ११ वाजता प्रेम आरवची बाईक घेऊन तिला घ्यायला ठरलेल्या ठिकाणी पोचला होता. अंजली अजुन आली नव्हती. हातात फोन घेऊन तिच्या घरी कॉल करावा की नको या विचारात ती येणाऱ्या दिशेकडे पहात तिची