अनुबंध बंधनाचे. - भाग 30

  • 297
  • 66

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३० )दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे प्रेम आवरून कामाला चालला होता. एरिया मधुन बाहेर पडताच मेन रोड ला त्याला समोरच स्कुटी घेऊन उभी असलेली अंजली दिसली.... तिने लांबुनच त्याला पाहून हात केला.... तो घाईतच तिच्याजवळ जाऊन पोचला आणि तिला म्हणाला.....प्रेम : तु काय करतेय इथे, एवढ्या सकाळी,...? आणि किती वेळा सांगितलं आहे तुला, इथे नको थांबत जाऊ, सगळे ओळखीचे लोक असतात इकडे.अंजली : अच्छा...! असुदे मग...! मला नाही कोण ओळखत इथे तुझ्याशिवाय....! आणि तसंही मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेय...! मग त्यांना काय प्रोब्लेम आहे का....?प्रेम : कधी कळणार तुला काय माहित...! आधी चल इथून....! *असं बोलत तो तिला मागे