आक्तेचा धनी मयतीची सर्व तयारी झाली होती.बाबुरावनं अंत्यवीधीची सर्व तयारी करण्यात काईबी कसर सोडली नोयती आन् आतं आक्ता उचलली जाणार होती.एवळ्यात बाब्याचा आवाज आला. "थांबा,मी आक्ता पकडीन." संबंध नातेवाईकांनं इकडं तिकडं पाह्यलं.त्याईले आश्चर्य वाटलं.बाबुराव असा का बोलते असंही त्याईले वाटलं.त्याचं कारणही तसंच होतं. बाब्याचा आंतरजातीय लगन होता.त्याले जातीपातीशीन लेनदेन नोयती.पण आंतरजातीय असुनबी त्यानं सास-याची सेवा केली होती.खरं तं तोच आक्तेचा धनी होता.त्याचा जसा आवाज आला.तसे नातेवाईक मणाले. "तुमी पोरगा होये का?आमच्या समाजात पोरगाच आक्ता पकळते.तुमी नाय पकडायची आक्ता." बाब्याच्याच घरुन मैयत निघत होती.आक्ता कोणीबी पकडो.पण