कौलाची वखार ध्यानीमनी नसताना बापूमास्तरांच्या बदलीचा हुकूम आला. मुख्याध्यापक तांबे म्हणाले, “पण तशी काळजी कराय नको.एक म्हणजे राज रस्त्यावरचा गाव , बापूमास्तरांची बहीण त्याच गावात दिलेली आहे म्हणजे दोन वेळच्या पुख्ख्याची सोय आणि मुख्याध्यापक म्हणून बढती. अजुन आठ वर्षे आहेत रिटायर व्हायला म्हंज्ये नाय म्हटले तरी पगारात दरमहा चव्वेचाळीस रुपये नी पेन्शन बारा