निदान शिक्षणात तरी जातीचा वापर करु नये

  • 375
  • 123

निदान शिक्षणात तरी जातीचा वापर होवू नये?          *जात आणि जातीप्रथा केव्हा नष्ट होणार. हा एक चिंतेचा प्रश्न आहे. जातीप्रथा देशात पाळली जात आहे व त्याच आधारावर भेदभाव करुन जाणीवपूर्वक जाणूनबुजून अत्याचार केला जात आहे. ज्याचे बिजारोपण शाळेतच केले जात असून शाळेतही जातीप्रथा अस्तित्वात आहे व तिथंही शिकतांना विद्यार्थ्यांचा पदोपदी अपमानच होत आहे. अन् तेवढाच त्रासही.*           काल जातीनं जातीवरच अत्याचार केला. आजही जातच जातीवर अत्याचार करीत आहे. तसं पाहिल्यास आज पाश्चात्त्य लोकांच्या सानिध्यात समाज आल्यानं समाज थोडासा सुधारला आहे. परीवर्तन झालं आहे. त्यामुळं आज जात नष्ट व्हायला हवी असं वाटत आहे. परंतु आज