शलाकाला पाहून साधिकाच्या मनात एक संशय येतो मात्र सध्या श्रेयाला यातून बाहेर काढणं जास्त गरजेचं असल्याने ती आजीला काही सूचना देऊन तिकडून निघते. आज रात्री श्रेयाच्या शरीरात असलेल्या आत्म्याचा नायनाट करायचा या निर्धाराने ती घरी येते व शुचिर्भूत होऊन ध्यानाला बसते. ------------------------------------------------------------राजाध्यक्ष घरी येताच कपाटातून काही जुने पुस्तके काढतो. त्यातल्या एका पुस्तकातील फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरतात. खरचं आंजनेय जिवंत असेल तर...आपलं काही खरं नाही..त्याला एव्हाना आपण केलेली दगाबाजी कळलीही असेल. बापरे मग आपल्याला लवकरात लवकर त्याच्याविषयी शोध घ्यायला हवाय. पण त्याच्याविषयी माहिती कुठून मिळेल? अशा सगळ्या विचारात तो असतानाच त्याला त्याच्या कपाटात एका ठिकाणी लपवून ठेवलेला साधकांचा वेश