राजकारण - भाग 2

  • 249
  • 66

राजकारण कादंबरी भाग दोन          वसीमला आठवत होता निवडणुकीपुर्वीचा काळ. सत्तेत अनेई साऱ्या पार्ट्या होत्या व त्या एकत्र येवून निवडणूक लढवीत होत्या. त्यामुळंच त्यांचे दोन गट बनले होते. पहिला गट होता महाविकास आघाडी व दुसरा पक्ष होता मित्रपक्ष. मित्रपक्षात तीन प्रमुख पक्ष व इतर,लहानमोठे पक्ष होते. तर महाविकास आघाडीतही तीच स्थिती होती. नुकताच एक बदलाव झाला होता. महाविकास आघाडीतील दोन पार्ट्या होत्या, त्यांना न्यायालयानं दोन नवीन चिन्हं दिलं होतं. तर त्यांच्याच पक्षाचं असलेलं जुनं चिन्हं हे मित्रपक्षाच्या पार्टीला दिलं होतं. त्यामुळंच संभ्रम होणार होता. तसाच फरकही पडणार होता. हे वसीमला माहीत होतं. परंतु वसीम ती गोष्ट कोणाला सांगून