आधी माणूस बना के एक गाव.त्या गावात सर्वच जातीधर्मातील लोकं राहात होते.गावात तसा भेदभाव नव्हता.सर्वच लोकं एकमेकांच्या घरी जेवायला जात असत.एकमेकांच्या सणउत्सवात सहभागी होत असत.तसेच एकमेकांना चांगले लेखत असत.जर एखाद्या घरी मयत झाल्यास ते मयतीला तर जात.जेवायलाही जात असत.मात्र त्या गावात असाही माणूस होता की जो स्वतःला उच्च जातीतील समजून तो मयतीलाही जात नसे व जेवायलाही जात नसे.तो जुन्या प्रथांचं काटोकाट पालन करीत असे. कलिराम त्याचं नाव होतं.तो गावात राहात होता.तो स्वतः उच्च जातीतील असून त्याच्या मनात अहंकार होता.तो स्वतःला उच्च जातीतील समजून कोणाच्याही घरी मयतीला जाणं टाळायचा.कनिष्ठ जातीच्या घरी मयतीला जाणे म्हणजे