पावसांच्या सरी

  • 780
  • 282

आकाशात सर्वत्र ढग दाटून आलेले होते. कधीही वाऱ्याची थंड झुळूक येईल आणि त्या ढगांतून पाण्याच्या धारा गडगडत खाली पडतील, असं एकदम आल्हाददायक वातावरण तयार झालं होतं. मी मात्र, पावसाचं पाणी गाडीच्या आत येऊ नये म्हणून खिडक्या बंद करून घरी जात होतो. पण आज, ज्या पावसाला मी एवढं टाळत होतो,त्याच पावसात, कधीकाळी मी शरीराने आणि मनाने पूर्णपणे चिंब भिजून गेलो होतो. जरी मी शरीराने गाडीच्या आत बसलो होतो, तरी मनाने भूतकाळातील त्या आठवणींमध्ये डोकावायला सुरुवात केली होती.आठवणी म्हणजे जणू काही मुंग्यांच्या वारुळासारख्या असतात; एकदा त्या सुरू झाल्या की थांबायचं नावच घेत नाहीत. मी कधी माझ्या विचारांत हरवत महाविद्यालयात पोहोचलो, हे मलाच