भाग 58आपल्यासाठी ती स्वतःच्या इच्छा आकांक्षा... संयमात ठेवते..सहवासाची आस तिलाही असते त्याला माहीत होते.... दोघांच्याही भविष्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे हे दोघांनाही समजत होते...एवढ्यात त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली....... आणि...मोहित मनात तिच्याकडे पाहत....."किती सुंदर दिसते आहे...??? नेहमीच जेव्हा बघावं तेव्हा सुंदर कशी काय दिसते बरं....??"ती स्वतःच्या डोक्यात खाली हात घेऊन निवांत झोपलेली असते. मोहित तिच्या कपाळावरची केस कानामागे करत तिला हळू आवाजात...."ए मायू.... उठ ना गं..... किती दिवस झाले आपण बोललो नाही.... आरामशीर... तुझ्यासाठी मी वेळ काढलाय उद्या आणि तू अशी झोपलीयेस...."त्यावर ती झोपेतच पुटपुटते...."अम्म. ....मोहित....जा बाबा... तू फक्त स्वप्नातंच मला वेळ देतोस...जा मग ....मी ....तुला पण स्वप्नातच किशी देते...अम्म...."असं