बी.एड्. फिजीकल - 9

  • 807
  • 1
  • 279

          बी. एड्. फिजीकल  भाग 9  तो माणूस फार घमेण्डखोर नी उर्मट होता. माझी कॉलर धरून धमकावीत ते बोलले, “काय रे  फुकण्या मला काय समजलास रे तू? तुझी औकात काय?” आता मात्र माझा संयम सुटला त्यांचा हात झिंजाडून बाजुला होत मी चिडून म्हणालो, “तुम्ही मोठे अहात, तुमचा आदर ठेवूनच मी बोलतोय्.... पन तुम्ही मला  गुंडा सारखं वागवलत. मी काही ऐरा गैरा नाही. रत्नागिरीचे शिक्षक आमदार ज.ग.भावे यांचा मी विद्यार्थी आहे. माझी काहीही चूक नसताना  तुम्ही माझा बाप काढलात, औकात काढलीत....मीआमदार भावेसरांकडे न्याय मागेन. त्या आधी मी ही गोष्ट प्राचार्यांच्या कानावर घालतो.”आता मात्र सरांच्या  पाया खालची वाळू सरकली.त्यांचा चेहेरा पडला. आमच्या