रिच डॅड पुअर डॅड (मराठी भाषांतरण) - प्रकरण 1

  • 2k
  • 696

डिस्क्लेमर:हे पुस्तक केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने लिहिले गेले आहे. येथे दिलेल्या आर्थिक संकल्पना, गुंतवणुकीचे मार्ग आणि अनुभव वैयक्तिक लेखकाच्या दृष्टिकोनातून मांडले गेले आहेत. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी वाचकांनी स्वतःचा अभ्यास करावा आणि आवश्यक असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लेखक किंवा प्रकाशक कोणत्याही आर्थिक निर्णयासाठी जबाबदार राहणार नाहीत.प्रकरण 1रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितल्यानुरुपमला दोन वडील होते. एक श्रीमंत, तर एक गरीब. त्यापैकी एक खूप उच्चशिक्षित आणि बुध्दिमान होते. त्यांनी पीएच.डी. मिळवली होती. महाविद्यालयातील चार वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी दोनच वर्षांच्या आतच पूर्ण केला होता. पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती. तिच्या साहाय्यानं त्यांनी स्टॅनफोर्ड, शिकागो आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून