खाजगीकरण - भाग 2

  • 612
  • 204

१३)          ती लहान लहान मुलं. तेही दिवसागणिक लहानाचे मोठे झाले होते. त्यांनीही आपलं करीअर कमावलं होतं. लहानपणचे मित्र सोडले होते. नवे मित्र, तेही महाविद्यालयातील मित्र धरले होते. आता संपर्क होता, तो म्हणजे त्या महाविद्यालयातील नवनवीन मित्रात. जे आता पाचवीतील मित्र नव्हते. त्रिशालाही ती विवाहीत होण्यापुर्वी पाचवीतील मित्रमंडळ आठवत नव्हतं. ती जशी दहावीत गेली व तिनं जसा महाविद्यालयात प्रवेश घेतला. तशी ती पाचवीतील मित्रांना विसरली. कारण तिनं ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या महाविद्यालयात तिच्या पाचवीतील कोणीच नव्हतं. कारण त्रिशा गुणवत्तायादीत होती व तिचं मित्रमंडळ गुणवत्तायादीत नव्हतं. त्यामुळंच ज्या महाविद्यालयात त्रिशाचा नंबर लागला होता. त्या महाविद्यालयात बाकी मुलामुलींचा